सॅमसंगचा स्वस्त स्मार्टफोन, नोकिया ‘आशा’ला टक्कर, Samsung launches its cheapest phone Galaxy Star at Rs 5240

सॅमसंगचा स्वस्त स्मार्टफोन, नोकिया ‘आशा’ला टक्कर

सॅमसंगचा स्वस्त स्मार्टफोन, नोकिया ‘आशा’ला टक्कर
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मोबाईल मार्केटमध्ये आता स्पर्धा पाहायला मिळत आहे. नोकियाने मार्केटमध्ये टीकून राहण्यासाठी स्वस्त मोबाईल आणला. आता सॅमसंगने सर्वात स्वस्त स्मार्टफोन बाजारात आणला आहे. `सॅमसंग स्टार` असे या नवीन स्मार्टफोनचे नाव आहे.

दक्षिण कोरीयाच्या सॅमसंग कंपनीने खास भारतीय ग्राहकांसाठी लॉन्च केलेला हा फोन नोकियाच्या आशा सीरीज आणि मायक्रोमॅक्स तसेच कार्बनसारख्या भरतीय कंपन्यांच्या मोबाईलशी स्पर्धा करण्यासाठी बाजारात आणला आहे.

या आधी सर्वात स्वस्त असणारा सॅमसंग गॅलॅक्सी व्हाय हा फोन ५ हजार ८९० रुपयांना होता. मात्र हा नवीन स्टार फोन त्यापेक्षाही कमी किंमतीत ग्राहकांना देण्याचा आम्ही प्रयत्न केल्याचे कंपनीने आपल्या म्हटले आहे. याची किंमत फक्त ५ हजार २४० रुपये आहे.



मोबाईलमध्ये काय असणार

*ड्युएल सिम स्लॉट
*२ मेगा पिक्सल कॅमेरा
*अॅन्ड्रॉइड ४.१ जेली बिन ऑपरेटिंग सिस्टीम
५१२ एमबी रॅम
*४ जीबी इन बिल्ट, ३२ जीबी क्षमता
*३ इंचाची स्क्रीन
*४.० ब्ल्यू टूथ
१२०० एमएएच क्षमतेची बॅटरी

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, May 25, 2013, 14:38


comments powered by Disqus