सॅमसंगने केली अॅपलच्या अप्सची चोरी, दंडाची शिक्षा, Samsung ordered to pay Apple $290m more for US pa

सॅमसंगने केली अॅपलच्या अॅप्सची चोरी, दंडाची शिक्षा

सॅमसंगने केली अॅपलच्या अॅप्सची चोरी, दंडाची शिक्षा
www.24taas.com, झी मीडिया, कॅलिफोर्निया

अॅपल कंपनीच्या आयफोन आणि आयपॅड या उत्पादनांमधील महत्त्वपूर्ण वैशिष्टयांची चोरी केल्याबद्दल सॅमसंग इलेक्ट्रॉ निक्सन या कंपनीस भराव्या लागणाऱ्या दंडामध्ये येथील सिलिकॉन व्हॅली कोर्टाने आणखी 290 दशलक्ष डॉलर्सची वाढ केली आहे.

सॅमसंग कंपनीने तयार केलेल्या 13 वेगवेगळ्या उत्पादनांमध्ये अॅपल कंपनीच्या कॉपीराइटचा भंग झाल्याचा निकाल याआधी न्यायमंडळाने दिला होता. यानंतर अॅपल कंपनीला 1.5 अब्ज डॉलर्सची नुकसानभरपाई देण्याचा आदेश देण्यात आला होता.
मात्र, अॅपल कंपनीच्या नुकसानाच्या किंमतीबद्दल न्यायमंडळाने चुकीचा निष्कर्ष कढल्याचे सांगत येथील जिल्हा न्यायाधीश ल्यूसी कोह यांनी सॅमसंगला 450 दशलक्ष डॉलर्सचा दंड भरण्याचा आदेश दिला होता. आता या निकालाविरोधात अपील करणार असल्याचे सॅमसंगने सांगितले आहे.

अॅपलने या निकालावर समाधान व्यक्त केले आहे. अॅपलसाठी हे प्रकरण केवळ नुकसानभरपाई आणि कॉपीराइटचा भंग इतपर्यंतच मर्यादित नाही. उत्पादनांच्या चौर्यकर्मास किंमत मोजावी लागेल, हे सॅमसंग कंपनीस दाखवून दिल्याबद्दल आम्ही न्यायमंडळाचे आभारी आहोत, असे अपलच्या प्रवक्त्या क्रिस्तिन ह्युजेट यांनी सांगितले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, November 24, 2013, 13:34


comments powered by Disqus