भारतात सॅमसंग सर्वात विश्वसनीय ब्रँड

भारतात सॅमसंग सर्वात विश्वसनीय ब्रँड

भारतात सॅमसंग सर्वात विश्वसनीय ब्रँड
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

भारतात दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग सर्वात विश्वसनीय ब्रँड असल्याचं म्हटलं जात आहे.

ब्रँड ट्रस्ट रिपोर्ट 2014 नुसार या यादीत सोनी दुसऱया नंबरवर तर टाटा तिसऱ्या नंबरवर आहे.

हे ब्रॅण्ड मागच्या वर्षी दुसऱ्या, तिसऱ्या आणि पाचव्या नंबरवर होते.

ब्रँड ट्रस्ट रिपोर्ट मागील चार वर्षापासून हा रिसर्च केला जात आहे, यात टॉपच्या शंभर कंपन्यांचा सहभाग असतो.

या यादीत दक्षिण कोरियाची एलजी कंपनी चौथ्या आणि नोकिया पाचव्या स्थानावर आहे.

कम्प्युटर बनवणारी कंपनी एचपी सहाव्या स्थानावर आहे, तर हिरो ७९ व्या स्थानावरून सातव्या स्थानावर येऊन पोहोचली आहे.

सुरूवातीच्या दहा बँण्डमध्ये होंडा आठव्या, रिलायन्स नवव्या आणि महिंद्रा एंड महिंद्रा दहाव्या स्थानी आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, January 30, 2014, 19:30


comments powered by Disqus