सॅमसंग स्मार्ट घड्याळ : मेल पाठवा, Samsung’s smartwatch sends email, clicks photos and does health check too!

सॅमसंग स्मार्ट घड्याळ : मेल पाठवा, काढा फोटो

सॅमसंग स्मार्ट घड्याळ : मेल पाठवा, काढा फोटो
www.24taas.com, झी मीडिया, सिडनी

तंत्रज्ञानाचा अत्याधुनिक वापर करणारी सॅमसंग कंपनीने आपल्या यशस्वी मोबाईल लाँचिंगनंतर आता घडाळ्याच्या माध्यमातून ई-मेल पाठविणे, फोटो काढणे आणि त्याचबरोबर आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

सॅमसंगने नविन घड्याळ लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. ४ सप्टेंबरला याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे. एक व्हिडिओच्या माध्यमातून या घड्याळाची माहिती दिली जाणार आहे. या नविन घडाळ्यात कॉम्प्युटिंग डिव्हाइसचे तंत्रज्ञान असणार आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ही सुविधा शक्य होणार आहे.

गॅलक्सी गिअर स्मार्टवॉचमध्ये ४ मेगापिक्सेल कॅमेरा असणार आहे. या घडाळ्याचा पट्टा कातड्याचा किंवा कापडाचा असेल. हे घड्याळात एंड्राईड ऑपरेटींग सिस्टीमवर आधारीत अॅप्स असेल. त्यामुळे फिटनेस ट्रॅकिंगची माहिती मिळण्यास मदत होईल. न्यूज डॉट कॉम डॉट एयुच्या गॅझेट माहितीनुसार हे घड्याळ १० तास चालेल. या घडाळ्याच्या बॅटरीची क्षमता १० तास आहे.

हे स्मार्टवॉट ३ इंट असणार आहे. या घडाळ्यात इंटरनेटची सोय असेल. त्यासाठी वायफायची सुविधा असेल. तसेच हे घड्याळ स्मार्टफोनच्या माध्यातून जोडले जाऊ शकते. त्यासाठी ब्ल्युटूथचा पर्याय असले.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, September 3, 2013, 13:41


comments powered by Disqus