Last Updated: Wednesday, June 12, 2013, 14:06
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीबॅंकेत नोकरी करणाऱ्यांसाठी एक खूश खबर आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये सर्वात मोठी भरती होत आहे. तब्बल १९ हजार पदांची भरती होणार आहे.
या नोकर भरतीबाबत स्टेट बॅंक ऑफ इंडिया १५ जूनला एक नोटीफिकेशन प्रकाशित करण्याची शक्यता आहे. त्यानुसार १९ हजार पदांची भरती होईल. यामध्ये क्लर्क पदांसाठी जागा आहेत.
या भरतीसाठी पदवी अभ्यासक्रम उतीर्ण आवश्यक आहे. तसेच ६० टक्क्यांसह बारावीत पास हवे. याव्यतिरिक्त स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडून एक परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेत पास झाल्यास तुम्हाल नोकरीची संधी मिळेल. तर मग लागा आतापासून अभ्यासाला.
या भरतीसाठी १८ ते २८ वयोमर्यादा अनिवार्य आहे. भरतीचे अर्ज ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. त्याबाबत १५ जूननंतर एक निवदेन किंवा जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, June 12, 2013, 14:06