`सेल्फी` म्हणजे मेन्टल डिसऑर्डर, selfie : mental disorder, says APA

`सेल्फी` म्हणजे मेन्टल डिसऑर्डर...

`सेल्फी` म्हणजे मेन्टल डिसऑर्डर...

www.24taas.com, झी मीडिया, शिकागो

`सेल्फी` हा प्रकार सोशल मीडियावर खूप गाजतोय. स्वत:च स्वत:चा फोटो काढून तो सोशल मीडियावर शेअर करणं हे जणू काही सध्याचं फॅड झालंय. पण, हा एक प्रकारचा मानसिक आजार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

नुकतंच, शिकागोमध्ये झालेल्या `अॅन्युअल बोर्ड ऑफ डिरेक्टर्स`च्या मीटिंगमध्ये `एपीए`नं ही माहिती उघड केलीय. हा एक `मेन्टल डिसऑर्डर`चा भाग असल्याचं एपीनं म्हटलंय. या डिसऑर्डरला सेल्फायटीस `selfitis` असं म्हटलं जातं. तुम्ही तुमच्या फोटोबद्दल खूपच काळजी घेता ज्यामुळे असं दिसून येतं की तुमच्यामध्ये आत्मविश्वास, आत्मसन्मान कमी आहे आणि `सेल्फी` सोशल मीडियावर शेअर करून तुम्ही तुमच्यातील कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न करता.
एपीच्या म्हणण्यानुसार, सेल्फायटीसच्या तीन लेव्हल्स आहेत.

बॉर्डरलाईन सेल्फाइटिसः एका दिवसात कमीत कमी तीन सेल्फी क्लिक करणं परंतु, त्याला सोशल मीडियावर शेअर न करणं.

एक्यूट सेल्फाइटिसः एका दिवसात कमीत कमी ३ सेल्फी क्लिक करणं आणि तिन्ही सोशल मीडियावर शेअर करणं.

क्रोनिक सेल्फाइटिसः दिवसभर स्वत:चीच सेल्फी क्लिक करत राहणं आणि सोशल मीडियावर त्याला सहापेक्षा जास्त वेळा शेअर करणं

एपीच्या म्हणण्यानुसार, या मेन्टल डिसऑर्डरचा सध्या तरी काहीच इलाज नाही. परंतु, Cognitive Behavioral Therapy (सीबीटी) च्या माध्यमातून यावर काही वेळेपुरता इलाज शक्य आहे.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, April 5, 2014, 20:11


comments powered by Disqus