Last Updated: Wednesday, June 11, 2014, 18:56
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई सध्या, सोशल वेबसाईटहून अधिक लोकप्रियता मिळवणाऱ्या ‘व्हॉटस् अप’ या अॅप्लिकेशननं युझर्ससाठी आणखी काही सोई-सुविधा उपलब्ध करून दिल्यात. त्यामुळे, यापुढे ‘व्हॉटस् अप’ युझर्स संबंधितांना ‘वर्ड’ आणि ‘पीडीएफ’ फाईलही पाठवू शकणार आहेत.
आत्तापर्यंत, व्हॉटस अपवर केवळ टेक्स्ट, फोटो आणि व्हिडिओची देवाण घेवाण करण्याची सोय होती. मात्र, बऱ्याचदा कामाच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या वर्ड आणि पीडीएफ फाईल मात्र पाठवण्याची सोय यामध्ये दिली गेली नव्हती. यूझर्सची ही गरज ओळखून ‘व्हॉटस् अप’नं आपल्या सुविधांमध्ये आणखीन सोई उपलब्ध करून दिल्यात.
या अपडेट तुमच्या लाडक्या ‘व्हॉटस् अप’वर उपलब्ध झाल्या आहेत. या नव्या फिचर्समुळे आपल्या व्हॉटस अपच्या युझर्सच्या संख्येत आणखीन वाढ होईल, यात शंका नाही. नुकतंच, व्हॉटस अपनं आपल्या पसर्नल सिक्युरिटीशी संबंधित फिचर्सही अपडेट केले होते. त्यामुळे, व्हॉटस् अपचं ‘लास्ट सीन’ ही सूचना इतरांना द्यायची किंवा नाही, हे यूझर्स ठरवू शकतात. तुम्ही व्हॉट्स अप शेवटचे कधी पाहिले हे मोजक्याच लोकांना कळू शकत होते. नव्या बदलांमुळे अॅन्ड्रॉइड युझर्सना ‘सीन-अनसीन’ पर्याय वापरणे सहज शक्य झालंय. साहजिकच, व्हॉटस् अप वापरणंही अधिक सोईचं झालंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, June 11, 2014, 18:56