लवकरच येत आहे ब्रँड न्यू `शेल कार` Shell car by cheverolet

लवकरच येत आहे ब्रँड न्यू `शेल कार`

लवकरच येत आहे ब्रँड न्यू `शेल कार`
www.24taas.com, मुंबई

मार्केटमध्ये एकापेक्षा एक दिमाखदार कार्स लॉन्च करणाऱ्या सर्वात मोठ्या कार निर्मात्या कंपनीने जनरल मोटार्स या आपल्या सब ब्रॅन्ड शेवरले अंतर्गत उत्कृष्ट ‘शेल कार’ लॉन्च करण्याच्या विचार केलाय. कंपनीने या उत्कृष्ट कारला येत्या नोव्हेंबर महिन्याच्या २ तारखेला लॉन्च करण्याचे ठरवले आहे.

शेवरलेची भारतीय मार्केटमध्ये हॅन्चबॅक आणि स्पार्क या कार्सची यशस्वी विक्री चालू आहे. पण शेवरलेची कंपनी मारूती, सुझुकी आणि होन्डायनी कंपनीसारखं आपल्या हॅन्चबॅकचं मार्केट वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. शेवरले शेल डीझेल आणि पेट्रोल ह्या दोन्ही आवृत्ती मध्ये बाजारात आणली जाणार आहे. या कारमध्ये १.२ लीटर पेट्रोल तसेच १.३ लीटर डीझेल सामावण्याची क्षमता आहे. त्यामुळे शेवरलेचं इंजिन दमदार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेवरलेचं मॉडेल आधुनिक पद्धतीने तयार करण्यात आलयं. कारचं वजन १०६५ किलो असून कंपनीने ५-स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्सचा प्रयोग केला आहे. कंपनीचा डॅशबोर्डही डॅशिंग आहे. कंपनीने कारची पूर्ण तीन वर्ष आणि १ लाख किलोमीटरची गॅरेंटी दिलीय. कंपनीने या देशातील रस्त्यांची माहिती लक्षात ठेवून कारची योग्यपूर्ण निर्मिती केलीय. कंपनीने कारच्या किमंतीबद्दल अजूनतरी ठोस अशी माहिती दिलेली नाहिय पण अंदाजे ४.५ लाखपर्यत कारची किंमत असू शकते.

First Published: Wednesday, October 31, 2012, 17:33


comments powered by Disqus