Last Updated: Tuesday, June 25, 2013, 13:40
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई विचार करा, जर हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी तुम्हाला त्याची पूर्वकल्पना मिळाली तर? होय... हे शक्य आहे. नुकत्याच तयार करण्यात आलेल्या एका संशोधनात्मक तंत्रज्ञानामुळे तुमचा स्मार्टफोन तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याअगोदरच अलर्ट करू शकेल.
आता स्मार्टफोन सांगेल की, तुम्हाला हृदय विकाराच्या झटक्याची शक्यता कितपत आहे. अमेरिकामधील सिलिकॉन व्हॅलीचे व्यावसायिक जॅक होल्ड्सवर्थ आणि किवी कंपनी यांनी मिळून यांनी मिळून ही टेक्नोलॉजी बाजारात आणलीय. या टेक्नोलॉजीमधील एक टॅटू स्वरुपातील चीप तुमच्या हाताला लावल्यास ती तुम्हाला तुमच्या शरीरातील रक्त प्रवाह आणि हृदय यांच्यात होणाऱ्या प्रत्येक बदलाची माहिती देण्याचं काम बजावणार आहे. या दरम्यान शरीरातील या बदलांची माहिती प्रथम स्मार्टफोनला कळणार आणि नंतर ती तुम्हाला... यामुळेच हृदय विकाराच्या झटक्यापासून संरक्षणासाठी मदत मिळू शकते.
जॅक होल्ड्सवर्थ यांच्या मते, ही टेक्नोलॉजी हृदयाचे विकार असणाऱ्या व्यक्तींना खूपच फायदेकारक ठरू शकेल. येत्या ५ वर्षात या टेक्नोलॉजीचा उपयोग लोकांना करता येईल, असंही त्यांनी म्हटलंय. तसंच पुढील १० वर्षात या टेक्नोलॉजीचा उपयोग लोकांच्या हृदयांतर्गत कसा होईल, याचेही प्रयत्न चालू असल्याचं त्यांनी सांगितलंय.
या प्रक्रियेत लोकांच्या हृदयात मायक्रोचीप बसवून तेथून स्मार्टफोनला सिग्नल दिले जातील. या संशोधनावर कंपनी सध्या काम करत आहे. मात्र, ही टेक्नोलॉजी विकसीत होऊन तिला बाजारात यायला वेळ लागेल. मात्र, यामुळे हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना बराच फायदा होईल, हे निश्चित...
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, June 25, 2013, 13:40