Last Updated: Monday, March 17, 2014, 15:39
www.24taas.com,झी मीडिय़ा, मुंबईमागील काही काळापासून सॉफ्टवेअर अपडेट्समुळं यूजर्सची नाराजी झेलणारी प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी अॅपलचा त्रास काही कमी होतांना दिसत नाहीय. नुकतंच कंपनीनं आयफोन आणि आयपॅडची ऑपरेटिंग सिस्टिम IOS मध्ये येत असलेल्या तक्रारींनंतर आयओएसचं ७.१ व्हर्जन अपडेट प्रसिद्ध केलंय, मात्र याद्वारेही यूजर्समध्ये नाराजीच आहे.
अमेरिकेतील न्यूज वेबसाईट `हफिंग्टन पोस्ट`मध्ये छापलेल्या एका अहवालानुसार एका नव्या सॉफ्टवेअर अपडेटनंतर आयफोन आणि आयपॅड यूजर्समध्ये कमालीची नाराजी आहे. यूजर्सचा आरोप आहे की, नवीन अपडेटमुळं डिव्हाईसच्या बॅटरीवर नकारात्मक परिणाम होतो, शिवाय फोनमधील कॉन्टॅक्ट गायब झाल्याचा आरोपही त्यांनी केलाय. ब्लू-टूथ कनेक्शनसोबतच की-बोर्डवरही वाईट परिणाम झालाय.
खूप दिवसांनंतर अॅपलनं IOSमध्ये मेजर अपडेट्ससोबत गेल्या सोमवारी याचं ७.१ हे अपडेटेड व्हर्जन प्रसिद्ध केलं. जेडनेट डॉट कॉमनुसार सध्या २१ टक्के लोक आयफोन आणि आयपॅडच्या या नव्या आयओएसवर काम करत आहेत. ग्राहकांनी आपल्या तक्रारी अॅपलच्या ऑफिशिअल पेजवर ट्विटरवरून प्रसिद्ध केल्या. एका आयफोन यूजरनं लिहिलं की, त्यांनी ३० मिनिटांपूर्वी आपला आयफोन चार्ज केला होता आणि अवघ्या ३० मिनिटातच त्यांचा फोन ९२ टक्के बॅटरी दाखवत होता.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो
करा.
First Published: Monday, March 17, 2014, 15:39