`समथिंग वेन्ट राँग`... `फेसबुक`ला मिळाली श्रद्धांजली!, something went wrong.... facebook down

`समथिंग वेन्ट राँग`... `फेसबुक`ला मिळाली श्रद्धांजली!

`समथिंग वेन्ट राँग`... `फेसबुक`ला मिळाली श्रद्धांजली!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

फेसबुक डाऊन झालं... हो हो सोशल नेटवर्किंग साईटमध्ये आघाडीवर असलेलं फेसबुक आज पहिल्यांदाच डाऊन झालं. तब्बल 20 मिनिटांसाठी फेसबुकची वेबसाईट आणि फेसबुकचं अॅप्लिकेशन बंद पडलं... आणि नेटीझन्स लगेचच हैराण झाले... त्यांची बेचैनी लगेचच बाहेर पडली इतर सोशल मीडियातून...

गुरुवारी दुपारी दीड ते 2.00 या काळात फेसबुक अचानक बंद झालं... फेसबुकच्या आजवरच्या इतिहासात ही वेबसाईट सर्वाधिक काळ होती बंद राहाली. ही गोष्टही नेटीझन्सच्या नजरेतून सुटू शकली नाही.

मॅथ्यू नावाच्या एका व्यक्तीनं गुगल+ वर `फेसबुक डाऊन आहे` अशी आपली तक्रार नोंदवली. ट्विटरवरही लगेचच जागृत नेटीझन्सनं उड्या मारल्या.....










`समथिंग वेन्ट राँग`... `फेसबुक`ला मिळाली श्रद्धांजली!

फेसबुक बंद पडल्यानं 24taas.com च्या रेफरल ट्राफिकवरही लगेचच हा फरक जाणवला... या दरम्यान फेसबुकचं रेफरल ट्रॅफिक धाडकन कोसळलं तर ट्विटरवर अचानक रेफरल ट्रॉफिक वाढल्याचं दिसून आलं.

नेटीझन्सनं आपलं एक जगच बंद पडल्यानं लगेचच दुसऱ्या पर्यायाचा आधार घेतल्याचं स्पष्ट दिसून आलं. तब्बल 10 मिनिटांनंतर फेसबुक आता पुन्हा सुरु झालंय.




सोशल नेटवर्कींग साईटस् कधीही बंद पडू शकणार नाही, कधीही क्रॅश होणार नाही, असा दावा फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गनं केला होता. त्याचा हा दावा खोडून काढत फेसबुक बंद पडलं...


पाहा काय केला होता मार्क झुकरबर्गनं दावा...




* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, June 19, 2014, 14:30


comments powered by Disqus