सोनीचे एक्स्पेरियामधील आणखी दोन स्मार्टफोन बाजारात Sony Xperia E1, Xperia T2 Ultra smartphones launc

सोनीचे एक्स्पेरियामधील आणखी दोन स्मार्टफोन बाजारात

सोनीचे एक्स्पेरियामधील आणखी दोन स्मार्टफोन बाजारात
www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई

आपल्या एक्स्पेरिया रेंजला पुढं नेत सोनी लवकरच दोन नवे स्मार्टफोन Xperia T2 Ultra आणि Xperia E1 लॉन्चं करणाच्या तयारीत आहे.

या दोन्ही मॉडेलच्या डिस्प्ले आणि कॅमेऱ्यावर विशेष लक्ष देण्यात आलंय. Xperia T2च्या यशानंतर कंपनी आणखी चांगल्या रेंजचे हे स्मार्टफोन आणत आहेत.

एक्स्पेरिया टी२ अल्ट्राचा डिस्प्ले ६ इंच असून १३ मेगापिक्सलचा दमदार कॅमेरा त्याला आहे. शिवाय या स्मार्टफोनमध्ये १.१ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पण आहे. 1.4 GHz Snapdragon Quad-core प्रोसेसरसोबतच या स्मार्टफोनमध्ये 1 GB चा RAM आहे. ज्यामुळं फोनला उत्तम प्रोसेसिंग स्पीड असेल.

Xperia T2 Ultra मध्ये 8GB ऑन बोर्ड स्टोरेज म्हणजेत इंटर्नल मेमरी आहे. त्याला ३२ जीबीपर्यंत वाढवू शकतो. या पावरफुल पॅकेजमध्ये 3000mAh ची बॅटरी लावण्यात आली आहे.

हा फोन अँड्रॉईड ४.३ जेली बिनवर चालत असून कंपनी हा फोन दोन प्रकारांमध्ये लॉन्च करणार आहे. ज्यात Xperia T2 Ultra सोबतच dual-SIM चीही सोय असणार आहे. Xperia T2 Ultra dual सुद्धा उपलब्धब असेल. विशेष म्हणजे, दमदार कॅमेरा आणि डिस्प्लेसोबत Xperia T2 Ultra हा संगीताची आवड असणाऱ्यांना आणखी आनंद देणारा असेल.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, January 15, 2014, 14:49


comments powered by Disqus