सोनी एक्सपीरीया टी-२ अल्ट्रा ड्युयल फोन लवकरच बाजारात Sony Xperia T2 Ultra Dual

सोनी एक्सपीरीया टी-२ अल्ट्रा ड्युयल फोन लवकरच बाजारात

सोनी एक्सपीरीया टी-२ अल्ट्रा ड्युयल फोन लवकरच बाजारात
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

भारतात सिंगल सिमचा स्मार्टफोन जवळपास ३२ हजार रुपयांपर्यत मिळतो. मात्र भारतातील एकमेव फोन सोनी एक्सपीरीया टी-२ अल्ट्रा ड्युयल सिमचा फोन असूनही, सिंगल सिमपेक्षा कमी किंमतीत लाँन्च केलांय. हा फोन २६ हजार रुपयांपेक्षाही कमी किंमतीत उपलब्ध आहे.

एक्सपीरीया टी-२ अल्ट्रा ड्युयल फोन ६ इंच स्क्रीनचा असून, (१२८०X७२०) रिझोल्यूशन आहे. तसेच १ जीबी स्टोरेज स्पेस आहे. फोनमध्ये इंटरनल मेमरी ८ जीबी असून, ३२ जीबी पर्यंत वाढवण्याची व्यवस्था उपलब्ध आहे.

टी-२ फोनचं वजन १७१ ग्रॅम आणि ७.७ मिमी पातळ आहे. ४०० एमएसएम क्वाड कोर प्रोसेसर आहे. या फोनमधील कॅमेरा १३ मेगापिक्सेल कॅमेरा आहे. त्यात ऑटो फोकस मोड, एचडी व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि एलईडी फ्लॅश यांसारख्या सुविधा आहेत.
 
समोरील कॅमेरा १.१ मेगापिक्सल असून, ७२०पी रिझोल्यूशनची व्हिडीओ रिकॉर्ड होऊ शकतो. या फोनची खासियत म्हणजे केवळ एका टचमध्ये गाणी, व्हिडीओ आणि चित्रपट शेअर करता येईल. सोनी एक्सपीरीया टी-२ हा फोन २० मार्चपर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 20, 2014, 17:31


comments powered by Disqus