`स्पाईस`चा स्वस्त ड्युएल सिम थ्रीजी स्मार्टफोन, spice launches stellar guide mi 438 smartphone

`स्पाईस`चा स्वस्त ड्युएल सिम थ्रीजी स्मार्टफोन

`स्पाईस`चा स्वस्त ड्युएल सिम थ्रीजी स्मार्टफोन

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

`स्पाईस` मोबाइल कंपनीनं आपला एक नवा ड्युएल सिम स्मार्टफोन बाजारात उतरवलाय... `स्टेलर ग्लाईड` या मोबाईलचा मॉडल नंबर आहे `एमआय-४३८`.

थ्रीजी सपोर्टीव्ह असा हा ड्युएल कोर प्रोसेसर आहे. स्पाईस स्टेलर ग्लाईडमध्ये १.३ जीएचझेड ड्युएल कोर प्रोसेसर उपलब्ध आहे. हा फोन अॅन्ड्रॉईड ४.२ वर आधारित आहे. यामध्ये ४१२ रॅम आहे. तसचं ४ जीबी बिल्टइन स्टोरेज या फोनमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये एक वेगळं मायक्रो एसडी कार्डही देण्यात आलंय, या कार्डमध्ये ३२ जीबी स्पेस उपलब्ध आहे.

स्पाईस स्टेलर ग्लाईडमध्ये ४ इंचाचा ओजीएस स्क्रीन आहे. याचं रिझोल्युशन आहे ८०० X ४८० पिक्सल... या फोनच्या मागच्या भागावर २ मेगापिक्सलचा फिक्स्ड फोकस कॅमरा आहे. तसंच समोर १.३ मेगापिक्सलचा कॅमेराही दिला गेलाय. यामध्ये एलईडी फ्लॅशही उपलब्ध आहे.

याशिवाय, या फोनमध्ये थ्रीजी, टूजी, वाय-फाय, जीपीएस, स्पाईस क्लाऊड २ जीबी स्टोअरेज, एफएम रेडिओ आणि ब्लूटूथही आहे. याची बॅटरी १३५० एमएएच आहे त्यामुळे ४ ते ५ तासांचा टॉकटाईम मिळतो.

महत्त्वाचं म्हणजे हा फोन तुमच्या खिशाला सहज परवडणाराही आहे. या फोनची सध्याची किंमत आहे ५,१९९ रुपये.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, April 12, 2014, 15:28


comments powered by Disqus