Last Updated: Monday, May 13, 2013, 17:51
www.24taas.com, झी मीडिया, सेऊल सॅमसंग इलेक्टॉनिक्सने सोमवारी ५ जी मोबाईल तंत्रज्ञानाचे यशस्वी परीक्षण केले असून यामुळे ग्राहकांना एक संपूर्ण चित्रपट एका सेकंदात डाऊनलोड करण्याची सुविधा मिळणार आहे.
दक्षिण कोरियाच्या या कंपनीने डाटा संप्रेषणाची ५ वी पिढीच्या अतितीव्र वायरलेस परीक्षण केले आहे. या दरम्यान दोन किलोमीटरच्या परिघात प्रति सेकंदाला एक गीगाबाइटपेक्षा अधिक गतीने डाटाची देवाण-घेवाण करण्यात आली.
ही नवीन प्रणाली बाजारात येण्यासाठी २०२० साल उजाडणार आहे. सध्याच्या ४ जी नेटवर्कच्या तुलनेत शंभरपट अधिक गतीने व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा नव्या प्रणालीत उपलब्ध होणार आहे.
या नव्या तंत्रज्ञानामुळे ग्राहक ३ डी फिल्म, गेम्स तसेच कोणत्याही क्षणाची अल्ट्रा हाय डेफिनेशन (यूएसडी) व्हिडिओ क्षणार्धात प्राप्त करू शकतात.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, May 13, 2013, 17:51