आत्महत्येपूर्वी फेसबुकवर लिहिली मुलाने `सुसाइड नोट` Suicide note on Facebook

आत्महत्येपूर्वी फेसबुकवर लिहिली मुलाने `सुसाइड नोट`

आत्महत्येपूर्वी फेसबुकवर लिहिली मुलाने `सुसाइड नोट`
www.24taas.com, डेहराडून

आत्महत्या करणारी व्यक्ती बऱ्याचदा आत्महत्या करण्यापूर्वी सुसाइड नोट लिहितात. पण डेहराडुनमधील शंतनू नेगी या १६ वर्षीय विद्यार्थ्यांने फेसबुकवर आपण आत्महत्या करणार असल्याचा मॅसेज पोस्ट केला आणि आत्महत्या केली.

आई-वडील घराबाहेर गेले असताना शंतनू याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने फेसबुकवर मित्रांसाठी ‘बाय एव्हरीवर, आय विल मिस यू.. आय क्विट’ असा मॅसेज लिहीला होता. सुरूवातीला ही पोस्ट त्याने गंमत म्हणून टाकली असल्याचं समजून मित्रांनी त्यावर गमतीदार कमेंट्स केल्या होत्या. शंतनू खरंच असं काही करेल असं कुणालाच वाटलं नव्हतं. मात्र जेव्हा त्यांना शंतनूने खरंच आत्महत्या केल्याची बातमी समजल्यावर त्यांनी श्रद्धांजली वाहायला सुरूवात केली.

डेहराडूनमधील शाळेत शिकणाऱा शंतनू शाळेतील हुशार विद्यार्थी असल्याचं सांगण्यात येतंय. अभ्यासात हुशार असणाऱ्या शंतनूने आत्महत्या का केली असावी, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. काही दिवसांपूर्वी मित्रांशी बोलताना ‘आपण निर्दोष आहोत. मला दोष देऊ नका.’ असं पोलिसांनी सांगितलं आहे.

First Published: Tuesday, December 4, 2012, 21:38


comments powered by Disqus