समोसे म्हणजे माझा जीव की प्राण - सुनिता विल्यम्स, Sunita Williams on Indian food

समोसे म्हणजे माझा जीव की प्राण - सुनिता विल्यम्स

समोसे म्हणजे माझा जीव की प्राण - सुनिता विल्यम्स
www.24taas.com, नवी दिल्ली

भारतीय वंशाची अंतराळवीर सुनिता विल्यम्स हिने भारताविषयीची असणारी आत्मियता पुन्हा एकदा व्यक्त केली. फक्त भारताविषयीची आत्मियताच तिने व्यक्त केली नाही. तर भारतीय संस्कृतीती पौराणिक महत्त्व असणाऱ्या भगवद्गीता आणि उपनिषदे यांचा देखील उल्लेख केला. तसेच भारतीय खाद्यपदार्थांबाबतही सुनिताने बरेच काही सांगितले. नवी दिल्लीतील नॅशनल सायन्स सेंटरला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांना उत्तरे दिली.

`माझे वडील गुजरातचे असल्याने हिंदुस्थानी खाद्यपदार्थ आजही मला अतिशय आवडतात. समोसा हा प्रकार तर माझा जीव की प्राणच आहे.` अंतराळ सफरीवर जातानाही मी माझ्या शिदोरीत समोसे नेले होते.` आणि अनेक दिवस त्यांचा मनमुराद स्वाद लुटत होते, असे सुनीताने आवर्जून सांगितले.

संस्कृती आणि परंपरांबद्दलचे आपले प्रेम अमेरिकेत राहूनही कायम ठेवल्याचे सांगत सुनीता म्हणाली की, अंतराळ सफरीत मी भगवद्गीता आणि उपनिषदे सोबत नेली होती.

First Published: Tuesday, April 2, 2013, 13:23


comments powered by Disqus