Last Updated: Friday, January 24, 2014, 16:50
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली टाटा मोटर्स जगातील सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक कार आणणार आहे. टाटाची क्लचलेस कार लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे. त्यासाठी टाटा मोटर्स कंपनी एएमटी तंत्रज्ञानावर संशोधन करत आहे. बंगळुरू शहरात मागील आठवड्यात नॅनो ट्विस्टच्या ४०० युनिटची नोंदणी झाली. नॅनो ट्विस्टला चांगला प्रतिसाद मिळला. त्याप्रमाणं नव्या ऑटोमॅटिक कारकडून कंपनीच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ऑटोमॅटिक कार ऑटोमॅटीक मॅन्युअल ट्रान्समिशन (एएमटी) तंत्रज्ञानावर आधारीत असेल.
चालवण्यास सहजता असणारी कार असेल. बाजारात टाटा मोटर्सची टक्कर मारूति सुझुकी इंडिया आहे. मारूतीदेखिल ऑटोमॅटिक कार आणणार आहे. भारतीय बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन क्लचलेस कार बनविली जाणार आहे.
तज्ज्ञाच्यां मते भारतीय ऑटोमोबाईल जगत हळूहळू ऑटोमॅटिकच्या कारच्या दिशेने झुकतो आहे. प्रत्येक सहाव्या कारमध्ये आता क्लचलेस टेक्नोलॉजी आहे. टाटा मोटर्सनं मागील वर्षी जीनीवा मोटर शोमध्ये अरीआ क्रॉसओवर ही कार सिक्स स्पीड ऑटोमॅटिक प्रकारात सादर केली होती.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, January 23, 2014, 21:06