नॅनो आता सीएनजीवर धावणार, Tata to launch Nano CNG this year, explore more export markets

नॅनो आता सीएनजीवर धावणार

नॅनो आता सीएनजीवर धावणार
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

सामान्य माणसाचा छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद आणि गरज ओळखून टाटाने नॅनोला बाजारात आणलं आणि त्यांना आपल्या स्वप्नांची किल्ली देऊन गेलं. नॅनो नंतर नॅनोचे नवे मॉडेल सीएनजी बाजारात आणण्याचे टाटा कंपनीचे मालक रतन टाटा यांनी ठरवलं आणि ते याच वर्षी आपल्यास पाहायला मिळणार आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार थायलंड, म्यानमार, इंडोनेशिया आणि बांग्लादेश येथील बाजारांमध्ये लवकरच नॅनोच्या सीएनजी मॉडेलचे पदार्पण होईल. कंपनी क्षमतेच्या पातळीवर ३,००० करोड रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे.

टाटा मोटर्सचे व्यवस्थापक संचालक पीएम तेलंग यांनी ११ व्या मोटर प्रदर्शनाच्या वेळी पत्रकारांना असे सांगितले की, नॅनोचे सीएनजी वर्जन आमच्या डोक्यात असून ते लवकरच आम्ही बाजारात आणणार आहोत. कंपनीच्या म्हणण्यानुसार युरोपीय बाजारात नॅनो उतरवण्यासाठी नॅनोच्या वेगवेगळ्या मॉडेलवर काम चालू आहे आशा आहे की ही याच वर्षात बाजारात येईल.

तेलंग यांच्या म्हणण्यानुसार कंपनी युरोपीय बाजाराची मागणी ओळखून त्यानुसार योग्य कारवर काम चालू आहे. नॅनो ही फक्त भारतीय बाजारातच आली असून युरोपातील हवामान, सुरक्षेबाबतच्या गोष्टी भारताच्या तुलनेत भिन्न आहेत. त्यामुळे युरोपीय बाजारात नॅनोचे पूर्णपणे भिन्न मॉडेल उतरवले जाणार आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार भारतानंतर थायलंड हे पहिलं शहर असेल जिथे नॅनो लवकरच दिसेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, June 21, 2013, 19:48


comments powered by Disqus