वॉट्स अॅपनं फेसबुकलाही टाकलं मागे! Teens increasingly preferring WhatsApp over Facebook

वॉट्स अॅपनं फेसबुकलाही टाकलं मागे!

वॉट्स अॅपनं फेसबुकलाही टाकलं मागे!
www.24taas.com, वृत्तसंस्था, लंडन

फेसबुकच्या डेली युजर्समध्ये घसरण होतेय. याचं कारण आहे वॉट्स अॅप आणि वी-चॅट सारखे नवे सोशल अॅप. कारण सध्याचे किशोरवयीन आणि तरुण चॅटिंगसाठी फेसबुक ऐवजी वॉट्स अॅपचा वापर करतांना दिसतायेत.

फेसबुककडूनही हे मान्य करण्यात आलंय की, त्यांच्या डेली युजर्स कमी झाले आहेत. तरुण साईटवर असतात पण त्याचा जास्त वापर करतांना दिसत नाहीयेत. एका वेबसाईटवरील बातमीनुसार, सध्या तरुणांचा लोंढा हा WhatsApp, We Chat आणि KakaoTalk सारख्या अॅप्सकडे वळलाय. कारण विनामूल्य तात्काळ संदेश पाठवणाऱ्या या सेवेनं त्यांना आकर्षित केलंय.

या अॅप्सवर आधीच त्यांच्या फोनबुकमध्ये असलेल्या मित्रांसोबत डायरेक्ट गप्पा-टप्पा मारता येतात. विविध गटांमध्ये या गप्पा रंगतात. २००९मध्ये वॉट्स अॅप हे अस्तित्त्वात आलं. सध्या ३५० मिलियन पेक्षा जास्त युजर्स या अॅपचा वापर करतायेत. त्यांनी ट्विटरलाही मागे टाकलंय... ट्विटरचे २१८ मिलियन युजर्स आहेत.

एका रिपोर्टनुसार अॅप्समध्ये जाहिरातीचा प्रयोग होऊ शकतो. स्नॅप चॅटसारखे खाजगी शेअरिंग, गेमिंग आणि संगीत शेअरिंग, फोटो यासारखे इतरही सेवा KakaoTalk मध्ये प्रदान केलीय.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, November 11, 2013, 16:34


comments powered by Disqus