Last Updated: Tuesday, September 27, 2011, 12:55
झी २४ तास वेब टीम, बालासोर 
उडीसा येथील चांदीपूरमधील परीक्षण केंद्रामध्ये भारताने शनिवारी अणुबॉम्ब नेण्यासाठी क्षमता असणाऱ्या ‘शौर्य’ मिसाइलची यशस्वी चाचणी करण्यात आली. लष्कराच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार परीक्षण केंद्राच्या (आईटीआर) भूमिगत परिसर- ३ मध्ये शनिवारी दुपारी २ वाजून २८ मिनिटांनी मिसाइलची चाचणी घेण्यात आली. उच्च टेक्नोलॉजीने सक्षम असलेल्या मिसाईलचे हे दुसरे परीक्षण होते. याआधी १२ नोव्हें, २००८ मध्ये याच ठिकाणी यशस्वी परीक्षण झाले होते.
विकासाच्या या टप्पावर डीआरडीओने टेक्नोलॉजीमध्ये सगळ्यात विकसित असणारे अशा स्वरूपाचे मिसाइलचे परीक्षण केले असल्याचे लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. हे मिसाइल वापरण्यास अगदीच सोयीस्कर आहे तर देखभालीसाठी कमी खर्च करावा लागतो, असे त्यांनी सांगितले
‘शौर्य’ आपल्यासोबत एक टन अणुवस्त्र आणि पांरपारिक शस्त्रात्र ७५० किलोमीटरपेक्षा जास्त लांब नेऊ शकतं. यामध्ये ठोस स्वरूपात इंधनाचा वापर हा दोन टप्पामध्ये करता येईल
First Published: Tuesday, September 27, 2011, 12:55