Last Updated: Friday, May 18, 2012, 09:53
www.24taas.com, वॉशिंग्टन कामुक जाहिरातींमध्ये दिसणाऱ्या स्त्रियांकडेही एक उपभोग्य वस्तू म्हणूनच पाहिलं जातं, असा शोध नव्या संशोधनात लागला आहे. सायक्लॉजिकल सायंस जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या लेखात यासंबंधी विवरण केलं आहे.
जर अंतर्वस्त्रांच्या जाहिरातीत जर पुरूष काम करत असेल, तर त्याच्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो आणि जर त्या जाहिरातीत स्त्री असेल तर तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन लगेच बदलतो. तर बऱ्याच जणांना यात काहीच फरक करावासा वाटत नाही.
या अभ्यासात सांगण्यात आलं की कामुक जाहिरातींमधील स्त्री आणि पुरूषांबद्दल लोकांच्या मनात वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिमा तयार होतात. फिलीप बर्नार्ड या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, “कामुक जाहिराती पाहून लोकांचे विचार बदलतात की फक्त दृष्टीकोन बदलतो. पण, हा अभ्यासाचा महत्वाचा भाग आहे. लोक आपल्या इच्छेनुसार जाहिरातीतील स्त्रियांबद्दल विचार करू लागतात आणि त्यातूनच त्यांचे विचार बदलतात.”
First Published: Friday, May 18, 2012, 09:53