Last Updated: Saturday, May 19, 2012, 08:50
www.24taas.com, मेलबर्न शास्त्रज्ञांनी सात हिंस्त्र डायनासोरांचे जीवाश्म मिळाल्याचा दावा केला आहे. हे डायनासेर ऑस्ट्रेलियन भूमीवर राहात असल्याचा या शास्त्रज्ञांनी दावा केला आहे.
मोनाश यूनिव्हर्सिटीच्या एका पथकाने १२ कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या पक्षीसदृश डायनासेरांचे जीवाश्म शोधले आहेत. पथकातील एका सदस्याने सांगितलं की, या प्रांतात आम्हाला डायनासेरचे अवशेष मिळण्याची अजिबात खात्री नव्हती. आम्हाला ज्या डायनासोरचे अवशेष सापले ते मांजरीच्या आकारापासून ते नऊ मीटर लांब एवढे होते.
या पथकाचे प्रमुख डॉ. टॉम रिच म्हणाले, “ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया प्रांतानजीक वेगवेगळ्या डायनासोर्सचे जवळपास १५०० हाडं आणि दात मिळाले आहेत.” या शोधाबद्दल माहिती ‘प्लस वन’ या जर्नलमध्ये प्रकाशित झाली आहे.
First Published: Saturday, May 19, 2012, 08:50