कागदावरून शाई मिटवणं आता शक्य - Marathi News 24taas.com

कागदावरून शाई मिटवणं आता शक्य

www.24taas.com, लंडन
 
शास्त्रज्ञांनी असं तंत्र शोधून काढल्याचा दावा केला आहे, की ज्यामुळे प्रिंट केलेल्या कागदावरून शाई काढून टाकता येईल. यामुळे त्या कागदावर पुन्हा प्रिंटिंग करता येणं शक्य होईल.
 
केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या एका पथकाने हे तंत्र विकसित केलं आहे. या तंत्राद्वारे प्रिंट केल्या कागदावरून शब्द आणि चित्र खोडता येऊ शकतं. यासाठी लेझर लाइटच्या शॉट पल्सेसचा वापर करण्यात येतो. या लेझर किरणांनी कागदाचं कुठछलंही नुकसान न होता त्यावरील शाईचं टोनरद्वारे बाष्पीभवन करणं शक्य आहे, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे.
 
या संशोधनामुळे भविष्यात काँप्युटर प्रिंटर किंवा फोटोकॉपी मशीनमधून बाहेर पडलेल्या कागदांचा पुनर्वापर शक्य आहे. यावर संशोधन करणाऱ्या पथकाचं नेतृत्व करणारे डॉ जूलियन एलिवूड म्हणाले, या संशोधनामुळे कागदांचा पुनर्वापर शक्य होईल आणि त्यामुळे कागद बनवण्यासाठी होणारी जंगलतोड बऱ्याच प्रमाणात कमी होईल.

First Published: Tuesday, May 22, 2012, 09:05


comments powered by Disqus