Last Updated: Friday, May 25, 2012, 09:52
नितीन पाटोळे, www.24taas.com, पुणे पुण्यातल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी शेतक-यांची कामधेनू ठरेल अशी बहुपयोगी स्कूटर तयार केलीये. या स्कूटरच्या सहाय्यानं अनेक दैनंदिन कामं करता येतात. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या स्कूटरचं कौतुक होतंय.
‘थ्री इडिएट’ सिनेमातला रँचोही फिका पडेल असं कर्तृत्व पुण्यातल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या या तिघा विद्यार्थ्यांनी केलयं. विशाल, तुषार आणि नईमुद्दीन या तीन मित्रांनी शेतक-यासाठी बहुपयोगी स्कूटर तयार केलीये. ही स्कूटर सामान्य स्कूटरसारखी दिसत असली तरी तिची काम करण्याची शक्ती मात्र अफाट आहे. विहिरीतून पाणी काढणं, औषध फवारणी, गवत कापणं, दळण दळणे अशी १२ कामं ही स्कुटर करु शकते. शेतक-याला डोळ्यासमोर ठेवून ही स्कूटर तयार करण्यात आली आहे.
बहुपयोगी स्कूटर बनवण्यासाठी ४० हजार रुपयांचा खर्च आलाय. एखाद्या शेतकऱ्याने मागणी केल्यास हे विद्यार्थी ही बहुपय़ोगी स्कूटर बनवून देण्यास तयार आहेत. त्यामुळं आगामी काळात एखाद्या शेतक-यांकडं बहुपयोगी स्कूटर दिसल्याचं आश्चर्य वाटणार नाही.
First Published: Friday, May 25, 2012, 09:52