Last Updated: Saturday, May 26, 2012, 14:41
www.24taas.com, लंडन नुकताच एक अद्भुत पद्धत शोधून काढण्यात आली आहे. या पद्धतीत जिवंत कोशिकांना हार्ड ड्राइव्हमध्ये ट्रान्सफर करता येऊ शकेल. विचित्र आणि अशक्य वाटत असलं तरी हे खरं आहे.
स्ट्रँफोर्ड यूनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ इंजिनीअरींग अँड मेडिसिनच्या शास्त्रज्ञांनी बऱ्याच प्रयत्नांनी डिजीटल सूचनांना एन्कोड करून हा प्रकार शोधून काढला.शोधाचं नेतृत्व करणाऱ्या जेरोम बोनेट यांनी सांगितलं, “भविष्यात अशा कोशिकांमध्ये सूचना राहाव्यात यासाठी आम्ही केलेल्या प्रयोगाचा निश्चितच उपयोग होईल. यामुळे आपल्याला कोशिकांचा इतिहास तपासता येऊ शकतो.”
याच संशोधन मोहिमेतील एक शास्त्रज्ञ असणाऱ्या टॉन सबसूनटॉर्न यांनी सांगितलं, की जीववैज्ञानिक क्षेत्रातील बहुतेक प्रश्न हे पर्वेतिहासाशी संबंधित असतात. एखादी कोशिका कॅंसर कोशिका कशी बनली? किंवा एकादी कोशिका सामान्यच कशी राहिली, याची उत्तर शोधण्यासाठी त्या कोशिकांचा पूर्वेतिहास तपासावा लागतो. यासाठीच कोशिकांना हार्ड डिस्कमध्ये ट्रान्सफर करण्याचा प्रयोग करावा लागला.
First Published: Saturday, May 26, 2012, 14:41