६ जूनला आकाशात दिसणार अद्भूत दृश्य - Marathi News 24taas.com

६ जूनला आकाशात दिसणार अद्भूत दृश्य

www.24taas.com, राजकोट
 
खगोलप्रेमींसाठी एक सुवर्णसंधी आहे. पृथ्वी आणि सूर्य यांच्या कक्षेमधून शुक्राचं भ्रमण होणार आहे. हे दृश्य पुढच्या बुधवारी म्हणजेच, ६ जून रोजी पाहायला मिळणार आहे. हा क्षण अनुभवण्यासाठी अभ्यासक आणि खगोलप्रेमी विशेष तयारीही करत आहेत.
 
भारत जनविज्ञान संस्थेचे अध्यक्ष जयंत पंड्या म्हणाले की, 'या शतकात असं दृश्य पाहाण्याची ही शेवटची संधी आहे. यापूर्वी २००४ साली शुक्राने अशाचप्रकारे पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधून भ्रमण केलं होतं. ही घटना या शतकातली शेवटची घटना असेल. हे दृश्य आता पुन्हा १०५ वर्षांनीच पाहायला मिळेल.'
 
टेलिस्कोपचा शोध लागल्यापासून शुक्राचं या प्रकारचं हे आठवं भ्रमण आहे. यानंतर शुक्राचं असं भ्रमण थेट २११७ मध्ये घडणार आहे. ‘कच्छ सौराष्ट्र खगोल विज्ञान क्लब’चे अध्यक्ष नरेंद्र गोर म्हणाले की, शुक्राच्या भ्रमणामुळे आकाशातील ग्रहांमधील अंतर समजून घेण्यास मदत होईल.

First Published: Thursday, May 31, 2012, 16:50


comments powered by Disqus