Last Updated: Friday, June 1, 2012, 20:44
www.24taas.com, नवी दिल्ली जगातील सर्वात प्रसिद्ध असलेल्या फेसबुक या सोशल नेटवर्कींग साइटवर लॉग इन होत नसल्याने आज अनेक नेटिझन्सला मनस्ताप सहन करावा लागला. तब्बल चार ते पाच तासांच्या खोळंब्यानंतर हा टेक्निकल प्रॉब्लेम दुरुस्त करण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.
आज सकाळपासूनच फेसबुकचे पेज लोड होण्यात अनेक अडचणी आल्यात. तर अनेकांचे प्रोफाइल डिसेबल झाल्याचे दाखविण्यात येत होते. या संदर्भातील समस्या सोडवण्यात आली असून सर्वांना आता आपल्या फेसबुकचा एक्सेस मिळत आहे, नेटिझन्सला झालेल्या गैरसोईबद्दल फेसबुकने माफी मागितली आहे.
सुमारे एक तास ही समस्या भेडसावत होती, असे फेसबुककडून सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात सुमारे चार ते पाच तास फेसबुकवरील हा खोळंबा सुरू असल्याचे अनेकांनी झी २४ तासला कळविले. झी २४ तासचे फेसबुक पेजही चार तास ओपन होत नव्हते.
First Published: Friday, June 1, 2012, 20:44