'ट्विटर'च्या फांदीवर आजपासून नवा पक्षी - Marathi News 24taas.com

'ट्विटर'च्या फांदीवर आजपासून नवा पक्षी

www.24taas.com, सॅन फ्रान्सिस्को
 
ट्विटरने आपल्या नव्या ‘ट्विटरबर्ड’चं चिन्ह लोकांसमोर आणलं आहे. हा ‘ट्विटरबर्ड’ म्हणजे वेगाने प्रगती करणारी कंपनी याची खूण आहे.  ट्विटरचे क्रिएटिव्ह डायरेक्टर डोग बौमन या संदर्भातच बोलताना म्हणाले, “गेल्या ६ वर्षांपासून संबंध जग आमच्या लहान आकाशी रंगाच्या पक्ष्याला ओळखतं. ही पक्षी ट्विटरची सर्व्हिस असणाऱ्य़ा प्रत्येक ठिकाणी आढळतो. हा पक्षी आमच्या ट्विटर कंपनीची ओळख बनला आहे. ”
 
“आजपासून ट्विटरची खूण आम्ही आणखी सोपी केली आहे. आजपासून हा पक्षीच ट्विटरची जागतिक ओळख असेल. यापुढे बुडबुड्यामध्ये लिहिलेल्या ट्विटर शब्दाची गरज नाही.” असंही बौमन पुढे म्हणाले.
 
“हा नवा पक्षी आमचं पक्षीशास्त्रावरील प्रेम, क्रिएटिव्ह डिझाइन आणि सोपी भूमिती यातून साकार झाला आहे.” असंही बौमन म्हणाले. ट्विटर हे माहितीचं नेटवर्क असून यातून आपल्याला आसपासची, आपल्या आवडीची माहिती वाचायला मिळते. ट्विटर २००६ लाँच झालं होतं. यावर जगातील बहुतांश प्रमुख सेलिब्रिटी आपल्या मनातील गोष्टी शेअर करत असतात.

First Published: Thursday, June 7, 2012, 12:17


comments powered by Disqus