काँग्रेसने केली फेसबुक, ऑर्कुट पोस्टर्सची होळी - Marathi News 24taas.com

काँग्रेसने केली फेसबुक, ऑर्कुट पोस्टर्सची होळी

झी २४ तास वेब टीम, ठाणे
 
सोशल नेटवर्किंग साईट्सबाबत सरकार दरबारी वाद धुमसत असतानाच त्याचे पडसाद इतरत्रही उमटू लागलेत. ठाण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फेसबुक, ऑर्कुटच्या पोस्टर्सची होळी केली.
 
या साईट्सवर पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी यांचे निंदनीय फोटो असल्याच्या निषेधार्थ कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. त्यांनी कॉम्प्युटरची तोडफोडही केली. या साईट्सविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली.
 
दरम्यान, सोशल नेटवर्किंग साइट्सवर प्रसिद्ध होणा-या वादग्रस्त मजकूरासंबंधी गूगल आणि फेसबुक या संकेतस्थळांनी योग्य काळजी घ्यावी, अशी तंबी सरकारने दिलीये. वेबसाईट कंपन्या सरकारच्या आवाहनाला जुमानत नसल्यानं त्यांच्यावर करडी नजर ठेवण्याचा इशारा माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री कपिल सिब्बल यांनी दिलाय. निंदनीय, घृणास्पद मजकूर आम्ही काढून टाकू असं फेसबुकच्या वतीनं सांगण्यात आलंय. तर देशातील कायद्याचे पालन केले जाईल आणि कंपनी धोरणानुसार मजकूर आक्षेपार्ह असेल तर तो काढून टाकला जाईल, मात्र एखादा मजकूर वादग्रस्त ठरला तर तो काढून टाकला जाणार नाही, असं गुगल च्या प्रवक्त्यानं स्पष्ट केलंय.

First Published: Wednesday, December 7, 2011, 06:03


comments powered by Disqus