कँसरवरील उपचार केवळ अर्ध्या तासात - Marathi News 24taas.com

कँसरवरील उपचार केवळ अर्ध्या तासात

www.24taas.com, लंडन
 
ब्रिटनच्या डॉक्टरांनी प्राथमिक स्तरावरील प्रोस्टेट कँसरचे उपचार केवळ अर्ध्या तासात करण्याचा उपाय शोधून काढला आहे.
 
'डेली मेल' या वृत्तपत्रात यासंदर्भात माहिती दिली आहे. प्रोस्टेट कँसरवरील प्राथमिक स्तरावरील उपचार हे टेक्निकल ऑपरेशनएवढेच प्रभावशाली असतात आणि या उपचारांचे दुष्परिणाम म्हणजेच साइड इफेक्ट्स कमी आहेत.
 
याच वृत्तपत्रातील दिलेल्या माहितीनुसार प्रोस्टेट कँसर झाल्यावर पुरूषांना कमी समस्यांशी सामना करावा लागतो आणि त्यामुळे पुरूष कामावर जाणं लवकर सुरू करू शकतात. हे उपचार तंत्र गिल्डफोर्डमधील रॉयल सर्व्हे काउंटी हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आला आहे.

First Published: Monday, June 11, 2012, 14:18


comments powered by Disqus