केवळ पाच हजारात लॅपटॉप - Marathi News 24taas.com

केवळ पाच हजारात लॅपटॉप

www.24taas.com, मुंबई
 
तुम्हाला लॅपटॉप घ्यायचा असेल तर थोडी वाट पाहा. कारण  केवळ पाच हजारात लॅपटॉप उपलब्ध होणार आहे.
 
कम्प्युटरनंतर आता लॅपटॉपहीमध्यमवर्गीयांच्या आवाक्यातयेण्याची चिन्हे असून लंडनस्थित भारतीय तज्ज्ञाच्या 'अलाईड कम्प्युटर्स इंटरनॅशनल (आशिया ) लिमिटेड ' याकंपनीने लॅपटॉप फक्त चारहजार ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्याचे  जाहीर केले आहे . तसेच आय - ३ सीपीयू असलेले कम्प्युटर १९ हजार ९९९ रुपयांत मिळणार आहेत .
 
जूनच्या मध्यापर्यंत हा लॅपटॉप बाजारात येणार आहेत . क्षेपणास्त्र तंत्रज्ञ आणि उद्योजक हिरजी पटेल यांच्या मालकीच्या ' अलाईड कम्प्युटर्स 'ने सुपर लोकॉस्ट कम्प्युटर्स बाजारात आणण्याचे कबूल केले आहे . यात लॅपटॉपचेथर्ड जनरेशनचे दहा इंची मॉडेल फक्त चार हजार ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध करूनदेण्यात येणार आहे .
 
आय  ७ असलेल्या लॅपटॉपचे लेटेस्ट थर्ड जनरेशन मॉडेलही लवकरच बाजारात येणार असून हा सर्वात वेगवान गेमिंग लॅपटॉप असेल , असा दावा पटेल यांनी केलाआहे . यात ३२ जीबी इतकी जबरदस्त रॅमही असणार आहे . किंमत खूपच कमीअसली तरी या लॅपटॉपच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही , अशीग्वाही हिरजी पटेल यांनी दिली आहे .
 
 

First Published: Monday, June 11, 2012, 20:46


comments powered by Disqus