Last Updated: Wednesday, June 13, 2012, 09:36
www.24taas.com, मुंबई तुम्ही आता तुमचं पाकिट घरी विसरलात तरी काळजी करायचं कारण नाही. मनी ऑन मोबाईल ही नवी सुविधा आता तुमच्यासाठी सुरू झाली आहे.
एम व्हॅलेट या एप्लिकेशननुसार एका SMS वर तुम्ही फोन रिचार्ज, मोबाईल पेमेंन्ट, डीटीएच पेमेंन्ट यासारखी बिलं भरू शकणार आहात. ही एक प्रिपेड सेवा असणार आहे. याद्वारे तुम्ही 20 रुपयांपासून ते 50 हजार रुपयांपर्यंतची बिलं भरू शकता.
या एप्लिकेशद्वारे तुम्ही कमीतकमी 10 रुपयांचे व्यवहार करणं बंधनकारक आहे. विमानाचं तिकीट, सिनेमाच्या तिकीटाचं बुकिंगही या सेवेद्वारे लवकरच सुरू होणार आहे.
First Published: Wednesday, June 13, 2012, 09:36