Last Updated: Thursday, June 21, 2012, 13:38
www.24taas.com, मुंबई 
प्रवासात सिनेमा पाहणं कोणाला आवडणार नाही. परंतु बऱ्याचदा पूर्ण लांबीचे चित्रपट बघता येत नाही. परंतु आता ती रिलायन्स ३जी आपल्यासाठी पुढे सरसावले आहेत. त्यामुळे आता कंपनीच्या ३जी ग्राहकांच्या स्मार्टफोनमध्ये अवघे सिनेमागृहच अवतरले असून कोणत्याही क्षणी, कोणत्याही ठिकाणी सुपरहिट सिनेमा बघण्याचा आनंद मिळवता येणार आहे.
ही सेवा देण्यासाठी रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडने रिलायन्स समूहातीलच ‘बिगफ्लिक्स’ या डिजिटल मनोरंजन क्षेत्रातील कंपनीबरोबर भागीदारी करार केला आहे. ही सेवा देण्यासाठी कोणत्याही प्रकारचे छुपे शुल्क वा डेटा शुल्क न आकारता अवघ्या ३० रुपयांत ही सेवा देण्याचा दावा कंपनीने केला आहे.
बिगफ्लिक्सच्या सहकार्यातून ग्राहकांना पहिल्यांदाच संपूर्ण लांबीचा आणि विनाखंडित चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे. अत्याधुनिक अशा ३जी द्वारे आपल्याला सिनेमा पाहता येणार आहे.
First Published: Thursday, June 21, 2012, 13:38