Last Updated: Saturday, June 23, 2012, 15:06
www.24taas.com, लंडन 
गुगल.. नेहमीच काही तरी नवं करण्याचा प्रयत्न करीत असतं. आज देखील असचं काही तरी खास गुगल सर्च इंजिनने केलं आहे. गुगलने होम पेजवर आज एक आव्हानात्मक असा डुडल प्रसिद्ध केला आहे. आव्हानात्मक म्हणण्याचे कारण असे की हा डुडल तुम्हाला विचार करायला लावणारा आहे. गुगलने संगणकशास्त्रज्ञ अॅलन मॅथिसन ट्यूरिंग यांच्या 100व्या जन्म दिवसा निमित्त हा डुडल तयार केला आहे.
यावेळीही गुगलने असाच एक भन्नाट प्रयोग केला आहे. गुगलने आपल्या डुडलमध्ये सहा tasks दिली आहेत. जस जसे तुम्ही प्रत्येक tasks यशस्वीपणे पूर्ण करत जाल तसे तसे Google या इंग्रजी अक्षरामधील प्रत्येक शब्दामध्ये रंग भरले जातात. गणिततज्ञ आणि संगणक शास्त्रज्ञ अॅलन मॅथिसन ट्यूरिंग यांचा जन्म 23 जून 1912 रोजी लंडन शहरात झाला.
भारतातील ब्रिटीश राजवटीत अॅलन यांचे वडील भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत होते. डिजिटल संगणकावर सर्वप्रथम काम करणाऱ्यामध्ये अॅलन यांचा समावेश होतो. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीचे संकेतलिपीतील संदेश डिकोड कामी त्यांनी खुप मोठे योगदान दिले आहे. यासाठी त्यांनी कोलॉसस नावाचा संगणक बनवला होता. महायुद्धानंतर ते राष्ट्रीय प्रयोगशाळेत दाखल झाले.
First Published: Saturday, June 23, 2012, 15:06