बाजारात लवकरच येणार ‘आकाश-२’ - Marathi News 24taas.com

बाजारात लवकरच येणार ‘आकाश-२’

www.24taas.com, नवी दिल्ली  
 
विद्यार्थ्यांसाठी कमी खर्चात उपलब्ध होणारा आकाश २ हा टॅबलेट लवकरच बाजारात दिसणार आहे. मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी नुकतीच ही माहिती दिलीय.
 
इतर टॅबलेटपेक्षा वेगळा ठरणाऱ्या 'आकाश-२' या टॅबलेटचा पाईथन, सी प्लस, सी प्लस प्लस इत्यादींसाठीही वापर केला जाऊ शकतो. डाटाविंड या ब्रिटनच्या कंपनीनं आत्तापर्यंत जवळजवळ १०० टॅबलेट्स मुंबई आयआयटीकडे सोपवले आहेत. सरकारनंही याला मंजुरी दिलीय आणि लवकरच याला बाजारात लॉन्च केलं जाईल. डाटाविंडचे सीईओ सुनीत सिंह तुली यांनी ही माहिती दिलीय.

First Published: Tuesday, June 26, 2012, 13:10


comments powered by Disqus