‘ड्रायव्हिंग’ करणारी सुपरकार... - Marathi News 24taas.com

‘ड्रायव्हिंग’ करणारी सुपरकार...

www.24taas.com, लंडन 
 
ट्राफिकमध्ये गाडी चालवताना कुणाला कंटाळा नाही येत? सगळ्यांनाच येतो... पण, यावर पर्याय मिळाला तर... तुम्ही कंटाळलात किंवा तुमचा ड्रायव्हिंगचा मूड नसेल आणि चक्क ड्रायव्हिंगची जबाबदारी तुमच्या गाडीनंच स्विकारली तर...
 
हो हे खरं आहे! तुम्हाला असा पर्याय आता मिळू शकतो. लंडनमधल्या एका इंजिनिअर्सच्या टीमनं अशी आधुनिक कार बनवली आहे. फक्त एक बटन दाबल्यानंतर ही कार स्वत:हून चालू शकते. निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार ही गाडी ट्राफिकच्या वेळी वाहकांसाठी खूप लाभदायक ठरू शकते. ट्राफिक जाम संपल्यानंतर पुन्हा गाडीनं ३० किमीचा स्पीड घेतल्यानंतर गाडीचं नियंत्रण पुन्हा वाहकाकडे असेल.
 
डेली मेलच्या बातमीनुसार, फोर्ड या अमेरिकन कंपनीच्या इंजीनिअर्सनी ही नवीन यंत्रणा शोधून काढलीय. पुढच्या पाच वर्षांत या टेक्नॉलॉजिसह या कंपनीच्या अनेक नवनवे मॉडेल्स बाजारात येण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि जर्मनीमध्ये या तंत्रज्ञानात आणखी भर घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
 
.

First Published: Wednesday, June 27, 2012, 12:08


comments powered by Disqus