गुगलचा 'नेक्सस ७' टॅबलेट लॉन्च - Marathi News 24taas.com

गुगलचा 'नेक्सस ७' टॅबलेट लॉन्च

www.24taas.com,  सॅनफ्रान्सिस्को
 
वेगवेगळे फोटो, पुस्तकं आणि फिल्म्सची ऑनलाईन खरेदी करण्याचा तुम्हालाही छंद असेल तर आता तुम्हाला गुगलच्या नेक्सस-७ या टॅबलेटचाही वापर होऊ शकतो. गुगलनं बुधवारी ‘नेक्सस – ७’ हा टॅबलेट कम्प्युटर लॉन्च केल्यामुळे अॅप्पल आयपॅडच्या मक्तेदारीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
 
नव्या पिढीच्या एन्ड्रॉईड सॉफ्टवेअरच्या साहाय्यानं या सात इंचाच्या टॅबलेटमध्ये गुगलनं युजर्ससाठी बऱ्याच सुविधा दिल्या आहेत. एखाद्या लहानशा पुस्तकाएवढचं या टॅबलेटचं वजन आहे. हे सॉफ्टवेअर तैवानच्या एसूस कंपनीनं बनवलंय. या टॅबलेटची किंमत कंपनीनं १९९ अमेरिकन डॉलर एवढी जाहीर केली आहे.
 
सॅनफ्रान्सिकोमध्ये गुगलच्या एका वार्षिक संमेलनाची वेळ साधून टॅबलेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ‘गुगलकडून नेहमीच काहीतरी नवं देण्याचा प्रयत्न असतो. यावेळी आम्ही हाच प्रयत्न कायम ठेवलाय. नेक्सससाठी आम्हाला ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्रिटन आणि अमेरिकेकडून ऑर्डरही मिळाल्यात. जुलै महिन्यात दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यापर्यंत आम्ही त्या पूर्ण करू’ असं एन्ड्रॉईड विभागप्रमुख हुगो बर्रा यांनी म्हटलंय.
 
 

First Published: Thursday, June 28, 2012, 11:33


comments powered by Disqus