२०१३ मध्ये येतोय 'फायरफॉक्स' मोबाइल - Marathi News 24taas.com

२०१३ मध्ये येतोय 'फायरफॉक्स' मोबाइल

www.24taas.com, हेलसिंकी
 
मोबाइलप्रेमींसाठी एक चांगली बातमी आहे. झेडटीई आणि टीसीएल या मोबाइल बनवणाऱ्या कंपनीने २०१३ या औद्योगिक वर्षात पहिला फायरफोक्स ओएस फोन बाजारात आणणार आहे.
 
या मोबाइलम्समध्ये क्वॅलकॉम्स स्नॅपड्रॅगन प्रोसेसर असतील. हा फोन स्मार्टफोनच्या व्यवसायात गुगल तसंच ऍपल या कंपन्यांना आव्हान देण्यासाठी काढण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे. अनेक मोठमोठ्या दूरसंचार कंपन्यांनी फायरफॉक्सच्या या फोनचं स्वागत केलं आहे.
 
फायरफॉक्स ब्राऊजरचे जनक मोझिल्लाचं म्हणणं आहे की मोबाइल नेटवर्कच्या संचालकांनीदेखील फायरफॉक्स फोनचं कौतुक केलं आहे. डच टेलीकॉम, स्प्रिंट, स्मार्ट, टेलिकॉम इटालिया, टेलिनॉर तसंच एतिसलात यांसारख्या जगभरातील मोबाइल कंपन्या फायरफॉक्स मोबाइलची वाट पाहात आहेत.

First Published: Wednesday, July 4, 2012, 13:01


comments powered by Disqus