Last Updated: Saturday, July 7, 2012, 14:44
www.24taas.com, ह्यूस्टन 
जगातील सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग वेबसाईट 'फेसबुक' लवकरच बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या नोकऱ्यांबाबत माहिती देणार आहे. कोणत्या कंपनीमध्ये कोणती पदे रिक्त आहेत, यासाठी फेसबुक एक वेबसाईट बनविणार आहे. आणि त्यामुळे इतर कंपन्यांसोबत फेसबुक याबाबत चर्चाही करीत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार फेसबुकसोबत जोडण्यासाठी अनेक कंपन्या उत्सुक आहेत. त्यामुळे अनेक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. फेसबुकचा वापर अशा चांगल्या कामासाठी होत असल्याने अनेक जण आनंद व्यक्त करीत आहेत.
सोशल नेटवर्किंगमधील फेसबुक ह्या वेबसाईटला अल्पावधीत तुफान प्रसिद्धी मिळाली, सोपे फिचर आणि त्याच्या सेवा यामुळे आता तरूणांना फेसबुकच्या माध्यमातून त्यांच्या आवडीच्या ठिकाणी काम करता येणार आहे. फेसबुकच्या या उपक्रमात ४.३ अब्ज डॉलर इतकी गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे अनेक कंपन्या फेसबुकसोबत जोडल्या जाणार आहे.
First Published: Saturday, July 7, 2012, 14:44