Last Updated: Thursday, July 12, 2012, 18:41
www.24taas.com, न्यूयॉर्क 
आशिया खंडाने ट्विट्स पोस्ट करण्यामध्ये आघाडी घेतली आहे. अमेरिकेतून सध्या सर्वाधिक ट्विट्स पोस्ट केल्या जातात. मात्र गेल्या काही महिन्यांत अमेरिकेतून ट्विट्स पोस्ट करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तरी याच कालावधीत आशिया खंडामधून ट्विट्स पोस्ट करण्याचे प्रमाण वाढले आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये आशिया खंडातील ट्विटर युझरची संख्याही वाढली आहे. जगभरातून केल्या जाणाऱ्या एकूण ट्विट्समध्ये अमेरिकेचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे २५ टक्के इतके आहे.
मात्र मार्च महिन्यात यामध्ये ३३० टक्क्यांनी घट झाली आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर जपान आणि इंडोनेशियाचा क्रमांक लागतो. जपानमधून १८ टक्के तर इंडोनेशियामधून १२ टक्के ट्विट्स केले जातात. ट्विट्स करण्यामध्ये भारताने आशिया खंडात चौथे स्थान पटकावले आहे.
First Published: Thursday, July 12, 2012, 18:41