गुगलची 'मेयर' म्हणतेय... 'याहूsss' - Marathi News 24taas.com

गुगलची 'मेयर' म्हणतेय... 'याहूsss'

www.24taas.com, सॅन फ्रान्सिस्को
 
याहू आणि गुगल या इंटरनेट कंपन्यांमध्ये सुरू असलेलं शीतयुद्ध आता सगळ्यांनाच परिचित झालंय. एकमेकांना धोबीपछाड देण्यासाठी दोन्ही कंपन्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. यातलाच एक भाग म्हणून ‘याहू’नं गुगलच्या मारिसा मेयर हिला आपल्या कंपनीत सामील करून घेतलंय.
 
३७ वर्षीय मारिसा मेयर ही आजपासून याहूमध्ये सीईओ म्हणून आपला कार्यभार स्विकारणार आहे. मेयर ही याअगोदर याहूची प्रतिस्पर्धी कंपनी गुगलबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून एक भाग बनली होती. तसंच इंटरनेट सर्च कंपनीमध्ये ती पहिली स्त्री  इंजिनिअर ठरली होती. आता, याहूनं आपल्या टेक्नॉलॉजी परिवर्तनासाठी मेयर हिला पाचारण केलंय. त्यामुळे अमेरिकन कॉर्पोरेट जगतातील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणूनही मारिसा ओळखली जातेय.
 
‘७० करोड इतकी युजर्सची संख्या असणाऱ्या याहूशी जोडलं जाणं हा मी माझा सन्मान समजते’ असं मारिसा हिनं म्हटलंय. गुगलमध्ये असताना मेयर हिनं गुगल मॅप्स, गुगल अर्थ, स्ट्रीट व्ह्यू अशा अनेक जबाबदाऱ्या चोख रितीनं पार पाडल्यात. १९९९ पासून ती गुगलमध्ये कार्यरत होती. आता मात्र, याहूबरोबर काम करण्यास ती उत्सुक आहे.
 
.

First Published: Tuesday, July 17, 2012, 11:57


comments powered by Disqus