Last Updated: Saturday, July 28, 2012, 19:40
www.24taas.com, विंडहोक नामीबीयात दोन लॉन टेनिस कोर्ट मैदानाच्या आकाराएवढ्या ‘शेरेनकोव’ टेलिस्कोपद्वारे वैश्विक किरणांना जेरबंद करण्याचं काम आज सुरु केलं आहे. हा जगातला सर्वांत मोठा टेलीस्कोप आहे.
शास्त्रज्ञांना यासंदर्भात विचारलं असता त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अशा प्रकारच्या टेलीस्कोप्सपैकी हा सर्वांत मोठा टेलीस्कोप असल्याचं त्यांचा दावा आहे. या टेलीस्कोपचं वजन ६०० टन असून २८ मीटर लांबीचं भिंग वापरण्यात आलेलं आहे.
अंतराळातील महत्वाच्या घटना पाहाण्यासाठी या टेलीस्कोपचा उपयोग होऊ शकतो. प्रचंड उर्जेच्या गॅमा किरणांद्वारे ब्रहमांडातील घटनांवरही नजर ठेवण्याचं काम या टेलीस्कोपने करता येणार आहे.
First Published: Saturday, July 28, 2012, 19:40