हॉकिंग्स यांनी निर्माण केला सुपर कम्प्युटर - Marathi News 24taas.com

हॉकिंग्स यांनी निर्माण केला सुपर कम्प्युटर

www.24taas.com, लंडन
 
प्रख्यात भौतिक शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्स यांनी युरोपमध्ये एक असा सुपर कम्प्युटर निर्माण केला आहे की ज्याची मेमरी अत्यंत शक्तिशाली आहे. केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या एका माहिती पत्रिकेत याबद्दल सांगण्यात आलं आहे.
 
हा कॉस्मॉस सुपर कम्प्युटर ब्रह्मांडातील रहस्यं उकलण्यास मदत करेल. हा या प्रकारचा पहिलाच कम्प्युटर आहे. युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर मॅथेमॅटिकल सायंसेसमध्ये आयोजित केलेल्या न्यूमेरिकल कॉस्मोलॉजी २०१२च्या कार्यशाळेत हा सुपर काँप्युटर सादर केला गेला.
 
स्टीफन हॉकिंग्स म्हणाले, “या सुपर कम्प्युटरमळे ब्रह्मांडातील अनेक गोष्टींची उकल होईल. अंतराळातील काही संकल्पनांची सैद्धांतीक पातळीवरील माहिती मिळेल, अशी आम्हाला आशा आहे.”

First Published: Tuesday, July 31, 2012, 12:34


comments powered by Disqus