डॉल्फिन्सची मानतात वर्गव्यवस्था - Marathi News 24taas.com

डॉल्फिन्सची मानतात वर्गव्यवस्था

www.24taas.com, लंडन
 
संशोधनानुसार शास्त्रज्ञांचा दावा आहे की डॉल्फिन्समध्येही वर्गव्यवस्था अस्तित्वात असते. डॉल्फिन्स वर्गव्यवस्थेनुसारच व्यवहार करतात. त्यांच्या वर्गवार भेद आसतात. आपल्या वर्गासोबच ते आपल्या ज्ञानाची देवाण-घेवाण करत असतात.
 
जॉर्जटाऊन विद्यापीठातील संशोधकाने ऑस्ट्रेलियातील ‘शार्क बे’मध्ये हे संशोधन केल्यानंतर ही माहिती समोर आली.मनुष्याच्या व्यतिरिक्त फक्त डॉल्फिनमध्येच असे वर्गभेद असतात, असंही संशोधकांनी सांगितलं.
 
डॉल्फिन आपल्या ज्ञानाची फक्त आपल्या वर्गासोबतचं देवाण-घेवाण करत असतात.संशोधकांनी डॉल्फिनचा हा अभ्यास करण्यासाठी शिकारीसाठी लागणाऱ्या उपकरणांचा आधार घेतला.

First Published: Saturday, August 4, 2012, 14:22


comments powered by Disqus