नको ते SMS थांबवा, कंपनीला धडा शिकवा - Marathi News 24taas.com

नको ते SMS थांबवा, कंपनीला धडा शिकवा

www.24taas.com, मुंबई
 
नको असणारे एसएमएस आपल्याला नेहमीच त्रासदायक ठरतात. आणि आता हेच एसएमएस बंदही करता येईल. आणि कंपनीला धडाही शिकवता येईल टेलिमार्केटिंग कंपन्यांच्या परेशान करणार्‍या ‘एसएमएस’पासून मोबाईलधारकांची आता सहज सुटका होणार आहे. त्यासाठी तक्रार करण्याची अथवा मोबाईल कंपनीची गॅलरी गाठण्याचीही गरज नाही. दिवसभर मारा होत असलेले ‘एसएमएस’ आता १९०९ या क्रमांकावर फॉरवर्ड करायचे बस्स.
 
नंतर ते त्रासदायक एसएमएस पाठविणार्‍या टेलिमार्केटिंग कंपन्यांवर टेलिकॉम रेग्युलेटरी ऍथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) जबर दंड आकारणार आहे. ट्रायने मोबाईलधारकांना दिलासा देणारा हा प्रस्ताव शुक्रवारी सादर केला. त्यातून अनावश्यक एसएमएस पाठवून लोकांना छळणार्‍या टेलिमार्केटिंग कंपन्यांना लगाम घातला जाणार आहे. मोबाईलधारकांवर एसएमएसचा मारा करणार्‍या कंपनीला दर एसएमएसमागे ५०० रुपये दंड.
 
दंड आकारणीनंतरही त्यांचा उपद्रव थांबला नाही तर दहा मोबाईलधारकांच्या तक्रारीनंतर मार्केटिंग कंपनीचे फोन कनेक्शन कापणार. हल्ली अनेक बँकाही खातेदारांना त्यांच्या खात्यातील व्यवहारांची माहिती रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार ‘एसएमएस’द्वारे पाठवतात. ट्रायच्या नव्या प्रस्तावामुळे बँकांची अडचण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती, पण ट्रायने त्यावर बँकांना रजिस्टर्ड टेलिमार्केटिंग कंपनीकडून सेवा घेण्याचा उपाय सुचवला आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

First Published: Sunday, August 5, 2012, 10:56


comments powered by Disqus