आकाशचा नवा टॅब लवकरच बाजारात - Marathi News 24taas.com

आकाशचा नवा टॅब लवकरच बाजारात

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
आकाशचं बुकिंग न करु शकल्यामुळे जर तुम्ही निराश झाला असाल तर तुमच्यासाठी ही नक्कीच आनंदाची बातमी ठरेल. आकाशची निर्मिती करणाऱ्या डाटाविंड  कंपनीने युबीस्लेट 7+ ही नवी टॅबलेट लवकरच बाजारात लँच करण्याचं ठरवलं आहे. युबीस्लेट 7+ साधारणत: २९९९ रुपयांना उपलब्ध होईल अशी शक्यता आहे. या  आधीची आकाश युबीस्लेट 7 टॅब फक्त विद्यार्थ्यांसाठीच उपलब्ध होती पण ही नवी टॅब सर्वांसाठी आणि सर्वत्र मिळणार आहे. आकाशचं नवं व्हर्जन युबीस्लेट 7+  भारतीय बाजारपेठेत जानेवारी २०१२ मध्ये लँच करण्यात येणार आहे. ubislate.com
या संकेतस्थळावर (वेबसाईट) बुकिंग करता येणार आहे. तसंच   1800.180.2180 या टोल फ्री नंबरवर संपर्क केल्यास अधिक माहिती मिळु शकेल.
 
२५६ रॅम आणि 2GB फ्लॅश तसंच स्टोरेजसाठी 2GB ते 32 GB, 2 स्टँडर्ड युएसबी पोर्ट आणि 800 *480 रेझोल्युशनचा सात इंच डिसप्ले ही या नव्या टॅबची काही खास वैशिष्ठ्यं आहेत. त्या व्यतिरिक्त पीडीएफ व्हिवर, टेक्स्ट एडिटर, मल्टिमीडिया आणि इमेज डिसप्ले ही सॉफ्टवेअर्स यात उपलब्ध करुन देण्यात आलं आहे.

First Published: Wednesday, December 28, 2011, 19:38


comments powered by Disqus