छोटा मायक्रोफोन पाहिलात कधी? - Marathi News 24taas.com

छोटा मायक्रोफोन पाहिलात कधी?

झी २४ तास वेब टीम, तेहरान
 
इराणच्या एका वैज्ञानिकाने जगातील सगळ्यात छोटा मायक्रोफोन बनविल्याचा दावा केला आहे. वैज्ञानिकाच्या मते याचा उपोयग कर्णबधिर असणाऱ्या लोकांना त्यांच्या यंत्रात या 'अदृश्य' मायक्रोफोनचा फायदा होईल.
 
एका न्यूज एजेंसीच्या मते ०.५ मिमी. लांबी आणि रूंदी  असणाऱ्या हा मायक्रोफोन इराणच्या तेहरान प्रातांतील उत्तर भागात असणाऱ्या नोशिरवानी विश्वविद्यालयातील बहराम अजिजुल्लाह गांजी याने सांगितले आहे कि, विश्व रेकॉर्ड आपल्या नावावर करण्यासाठी निवदेन करणार आहे. या यंत्राचा उपयोग अनेक कारणांसाठी होऊ शकतो हृद्यविकार याच्यासाठी देखील याचा वापर करता येईल, तसचं समुद्रात त्याच्या अंतरंगात समुद्रातील जीवांना ओळखण्यासाठी किंवा समुद्र अतर्गंत ध्वनीलहरी आणि अल्ट्रासाउण्ड जाणून घेण्यासाठी याचा उपयोग करता येईल.
 
तर इतकच नव्हे तर या छोट्या मायक्रोफोनचा उपयोग दूरसंचार, सूचना आणि सुरक्षा क्षेत्रात या लहान मायक्रोफोनचा उपोयग करता येणार असल्याचा दावा केला गेला आहे. जवळजवळ अदृश्य मायक्रोफोन हे  अतिसंवेदनशील आहे, आणि त्याची किंमत देखील कमी आहे. तसचं त्यासाठी फार वीजेचा वापर देखील होत नसल्याने याचा खूप मोठा फायदा असल्याचे सांगण्यात येते.

First Published: Wednesday, December 28, 2011, 22:57


comments powered by Disqus