चेहरा वाचून खाद्यपदार्थ देणारं वेंडिंग मशीन - Marathi News 24taas.com

चेहरा वाचून खाद्यपदार्थ देणारं वेंडिंग मशीन

Tag:  
झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
अमेरिकेत एका कंपनीने एक असं खाण्याचं वेंडिंग मशीन तयार केलं आहे की जे लोकांचा चेहरा वाचून त्याचं वय आणि लिंग याची ओळख पटवून त्यांना खाद्य पदार्थ द्यायचा कि नाही द्यायचा याचा निर्णय घेऊ शकतं.
क्राफ्ट फूड्सने इंटेलच्या सहकार्याने या अत्याधुनिक मशीनची निर्मिती केली हे. मशीनच्या समोर उभं राहण्याला व्यक्तीचे वय आणि लिंग याची ओळख बायोमेट्रिक स्कॅनच्या वापराने करेल. सध्या या मशीनचा उपयोग प्रायोगिक तत्तवावर शिकागो आणि न्यूयॉर्क मध्ये करण्यात येतो आहे.
मशीनमध्ये जेलीच्या मिठाईचा एक पाऊच ठेवण्यात आला आहे तो केवळ वयस्कर व्यक्तींनाच विकण्यात येणार आहे. मशीनच्या समोर जर कोणी मिठाई घेण्यासाठी पुढे आला तर स्क्रीनवर एक संदेश येतो की माफ कर मुला अजुन तुझे वय खुप लहान आहे. तुला अशा प्रकारचा षौक आता करणं योग्य नाही. आपण कृपया या मशीनसमोरून बाजूला व्हा वयस्कर व्यक्तींना याची मजा लुटू द्या. लॉस एंजेलिसमध्ये या मशीनच्या बाबतीत एक रिपोर्ट छापून आला आहे. पण मशीनला असा कोणताही नियम लागु नाही ज्यामुळे आई वडिल आपल्या लहान मुलाला मिठाई घेऊन देण्यास मनाई करु शकते.

First Published: Thursday, December 29, 2011, 23:05


comments powered by Disqus