पोर्श डिझाईनच्या स्मार्टफोनची नजाकत - Marathi News 24taas.com

पोर्श डिझाईनच्या स्मार्टफोनची नजाकत

झी २४ तास वेब टीम, मुंबई 
 
रिसर्च इन मोशन या कंपनीने पोर्श डिझाईनच्या सहकार्याने ब्लॅकबेरी स्मार्टफोन पोर्श डिझाईन पी ९९८१ हे लेटेस्ट मॉडेल लँच केलं. पोर्श डिझाईने डिझाईन केलेला या स्मार्टफोनची लिमिटेड एडिशन उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमुळे लक्झरी आणि जबरदस्त परफॉर्मन्स आनंद ग्राहकला मिळेल. पोर्श डिझाईन पी ९९८१ हा खऱ्या अर्थाने लक्झरी स्मार्टफोन आहे आणि त्यात पोर्श डिझाईनची स्टाईल आणि ब्लॅकबेरीचा परफॉर्मन्स अनुभवता येईल.
 
या टचफोनला अर्थात क्युडब्ल्युईआरटी कीबोर्ड आणि स्टेनलेस स्टील फ्रेम आणि लेदरच्या ब्लॅक कव्हरमुळे वेगळाच उठाव आला आहे. या फोनमध्ये असलेल्या एक्सक्लुझीव्ह पीनमुळे दुसरा पी ९९८१ स्मार्टफोन युझर ओळखता येणार आहे. रीमने यात नेक्स्ट जनरेशन ब्राऊझर उपलब्ध करुन दिला आरहे. लिक्विड ग्राफिक्स तंत्रज्ञानाने एक अपूर्व अनुभव या फोनमुळे घेता येईल.
 
 

First Published: Saturday, December 31, 2011, 08:51


comments powered by Disqus